Indian government food delivery app will compete with Swiggy

भारत सरकारचं फूड डिलिव्हरी अ‍ॅप देणार स्विगी-झोमॅटोला टक्कर? पाहा कोणतं आहे हे अ‍ॅप

Indian government food delivery app will compete with Swiggy

ध्याच्या काळात ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांना चांगली मागणी आहे. धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल अनेकजण बाहेरून जेवण मागवण्याला प्राधान्य देतात. शिवाय, ऑनलाईन फूड डिलिव्हरी सुविधेमुळे कोणत्याही वेळेला जेवण मागवता येतं.
अशा परिस्थितीमध्ये झोमॅटो, फूड पांडा, उबर इट्स आणि स्विगीसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. असं असलं तरीही अलीकडच्या काळात ग्राहकांना या फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या सेवांचा त्रास होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून भारत सरकारनं ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सचा (ओएनडीसी) पर्याय आणला आहे.

ओएनडीसी काय आहे?

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) भारत सरकारनं विकसित केलेली साईट आहे.

हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर करून रेस्टॉरंट मालक आपलं अन्न थेट ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतात. याशिवाय, ओएनडीसीच्या माध्यमातून किराणा सामान, होम डेकॉर साहित्य, साफसफाईच्या आवश्यक गोष्टीदेखील घरपोच मिळवता येतात.

स्विगीज इन्स्टामार्ट, झेप्टो आणि ब्लिंकिटसारख्या प्रायव्हेट अ‍ॅप्सप्रमाणेच ओएनडीसी कार्य करतं. ओएनडीसी प्लॅटफॉर्म सप्टेंबर 2022 पासून कार्यरत आहे.

पण, आता त्याला लोकप्रियता मिळत आहे. एका रिपोर्टमधील माहितीनुसार, अलीकडेच या प्लॅटफॉर्मनं 10 हजार दैनंदिन ऑर्डरचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस नागरिक अधिक प्रमाणात ओएनडीसीचा वापर करत आहेत.

अनेकजण ओएनडीसी आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे डिलिव्हरी मिळालेल्या खाद्यपदार्थांच्या किंमतींची तुलना करणारे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

ओएनडीसीद्वारे वितरित केलेल्या खाद्यपदार्थांची आणि इतर वस्तूंची किंमत इतर डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या तुलनेनं कमी आहे. भारत सरकारच्या ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ या विभागाकडे ओएनडीसीची मालकी आहे.

दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, भोपाळ, शिलाँग आणि कोईम्बतूर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ओएनडीसी सुविधा सुरू केली गेली होती. या ठिकाणी सरकारच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार सुरू आहे.

Indian government food delivery app will compete with Swiggy

देशामध्ये ई-कॉमर्सला प्रोत्साहन मिळावं आणि त्यात वाढ व्हावी या साठी सरकारनं हा उपक्रम सुरू केला आहे. ओएनडीसीच्या लोकप्रियतेत वाढ होत असल्यामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि इतर होम डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये स्पर्धा वाढणार आहे.

याचा फायदा मात्र सामान्य नागरिकांना होणार आहे. त्यांना स्वस्त दरांत सुविधा उपलब्ध होणार आहे.

Comments (0)
Add Comment