The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर तामिळनाडूत घातली बंदी; काय आहे कारण ?
या वृत्ताला दुजोरा देताना तामिळनाडू थिएटर्स अँड मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम सुब्रमण्यम म्हणाले की, काही मल्टिप्लेक्सने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘हा चित्रपट भारताच्या काही मल्टिप्लेक्समध्ये, विशेषतः पीव्हीआरमध्ये दाखवला जात होता. चित्रपटात प्रसिद्ध स्टार नसल्याने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय स्थानिक मल्टिप्लेक्सने आधीच घेतला होता. कोइम्बतूरमध्ये आतापर्यंत फक्त दोनच शो झाले आहेत – एक शुक्रवारी आणि दुसरा शनिवारी. पण या शोलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
हे पाहूनच चित्रपटगृहाच्या मालकांनी हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू राज्यात ‘द केरळ स्टोरी’चे प्रदर्शन थांबवण्याच्या मागणीसाठी तमिलार कच्ची (NTK) ने केलेल्या विरोधानंतर 7 मे पासून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांनी तेथील लोकांना चित्रपट न पाहण्याचा आणि थिएटर मालकांना तो प्रदर्शित न करण्याचा इशाराही दिला असल्याचे वृत्त आहे.
‘न्यूज मिनिट’मधील एका अहवालात म्हटले आहे की, राज्य सरकारला या चित्रपटावर बंदी घालण्याचीही इच्छा नाही आणि तो चालवायचा नाही.
मल्टिप्लेक्सवाल्यांनी आपल्या निर्णयामागे कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दिले असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, मदुराईमधील एका थिएटर व्यवस्थापकाने आरोप केला आहे की पोलिसांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा सल्ला दिला होता आणि सतर्क राहण्यास सांगितले होते. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी देशभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.