Why do bike disc brakes have so many holes?

Why do bike disc brakes have so many holes? बाईकच्या डिस्क ब्रेकला इतके छिद्र का असतात.

लीकडच्या काळात भारतीय बाजारात येणाऱ्या जवळपास सर्वच बाईक्समध्ये आपल्याला डिस्क ब्रेक्सचा दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने कंपन्या आपल्या बहुतांश बाईक्सला डिस्क ब्रेक देत आहेत. उत्तम ब्रेकिंगसाठी ड्रम ब्रेक्सपेक्षा डिस्क ब्रेक जास्त फायदेशीर आहेत.

पण, तुम्ही कधी विचार केलाय का की, डिस्क ब्रेक्समध्ये छिद्र कशासाठी असतात? चला तर मग जाणून घेऊया…

Why do bike disc brakes have so many holes?

मोटरसायकलच्या पॉवर आणि वजनानुसार मोटारसायकलमध्ये डिस्क ब्रेकची संख्या बदलते. सामान्यतः मोटारसायकलमध्ये फ्रंट सिंगल डिस्क पाहायला मिळते. याउलट, सुपरबाइकला समोरच्या बाजूला डबल डिस्क आणि मागील चाकावर सिंगल डिस्क मिळतो. या प्रत्येक डिस्कवर अनेक छिद्र असतात. याचा नेमका उपयोग काय…

डिस्क ब्रेकमध्ये छिद्र असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ब्रेक पॅड आणि डिस्कमध्ये अनेक वेळा व्हॅक्यूम तयार होतो, ज्यामुळे ब्रेक पॅड डिस्कला चिकटून राहू शकतो.

यामुळे अचानक आणि अर्जंट ब्रेकिंग केल्यानंतर ब्रेक पॅड आणि डिस्क चिकटून बसू शकते. यामुळे अपघातही घडू शकतो. पण, डिस्कमधील छिद्रांमुळे व्हॅक्यूम तयार होत नाही आणि पॅड डिस्कला चिकटत नाहीत.

दुसरे कारण म्हणजे, ब्रेकिंगमुळे होणाऱ्या घर्षणामुळे डिस्क खूप गरम होतात. अशा परिस्थितीत, डिस्क क्रॅक होण्याचा धोका असतो. पण त्यात छिद्रे असडल्यामुळे त्यातून हवा बाहेर पडत राहते आणि डिस्कचे तापमान राखले जाते. यासोबतच, ब्रेक पॅड्सही जास्त गरम होत नाहीत आणि त्याचे रबर दीर्घकाळ काम करतात.

हे छिद्र दमट किंवा पावसाळी हवामानात ब्रेक लावताना डिस्कवर साचणारे पाणी बाहेर फेकतात, त्यामुळे पॅड डिस्कवरुन सरकत नाहीत आणि ब्रेकिंग योग्य होते. मात्र, पावसाळ्यात मोटारसायकल बराच वेळ पाण्यात उभी राहिल्यास ती डिस्क स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. त्यामुळे गंजण्याची समस्या उद्भवत नाही.

 

Comments (0)
Add Comment