Inspirational! 6 Govt job offers with ISRO rejected for UPSC

0 650

बळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अनेकांचा प्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे.

बळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अनेकांचा प्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे.

आयपीएस ऑफिसर तृप्ती भट या उत्तराखंडच्या अल्मोडाच्या रहिवासी आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तसेच चार भावंडामध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. बारावीनंतर त्यांनी पंतनगर युनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलं. तृप्ती यांनी ISRO सह सहा नोकऱ्यांसाठीची परीक्षा पास केली होती. तसेच अनेक प्रसिद्ध खासगी संस्थांकडून त्यांना जॉबची ऑफर होती.

तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली आणि 165 रँक मिळवत IPS ऑफिसर झाल्या.

आयपीएस तृप्ती भट यांनी राष्ट्रीय स्तरावर 16 व 14 किमी मॅरेथॉन आणि राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. यासोबतच त्या तायकांडो आणि कराटेमध्ये देखील पारंगत आहेत. तृप्ती यांच्या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.