Mobile Lost Complaint Online

0 532

Mobile Lost Complaint Online

याद्वारे बनावट मोबाइल फोन मार्केटला आणि मोबाइल फोन चोरीला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

गेल्या काही वर्षात मोबाईल चोरीचे प्रमाण अधिकच वाढले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये मोबाइल हरवण्याचे (Mobile Lost) किंवा चोरीस जाण्याचे प्रकार सतत घडताना पाहायला मिळत आहे.

मात्र मोबाइल चोरीला गेल्यावर तो परत मिळणार का? त्याचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असे प्रश्न पडतात. सोबतच मोबाइलचा शोध घेण्यासाठी त्याची तक्रार करण्याची आणि आपला डेटा सुरक्षित राहावा, याची चिंता अनेकांना लागलेली असते.

विशेष म्हणजे मोबाईल सापडेल का? असं देखील अनेकांना प्रश्न पडतो. मात्र आता हरवलेला किंवा चोरीस गेलेला मोबाइल शोधण्यासाठी शासनाचे नवीन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

याद्वारे बनावट मोबाइल फोन मार्केटला आणि मोबाइल फोन चोरीला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

डीओटी सर्व मोबाइल ऑपरेटर्सच्या आयएमईआय डेटाबेसला जोडणारी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री (सीईआयआर) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बनावट मोबाइल फोन मार्केटला आणि मोबाइल फोन चोरीला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सीईआयआर सर्व नेटवर्क ऑपरेटरसाठी ब्लॅक लिस्टेड मोबाइल डिवाइस शेअर करण्यासाठी केंद्रीय सिस्टीम म्हणून काम करते, जेणेकरून एका नेटवर्कमध्ये ब्लॅकलिस्ट डिवाइस आणि इतर नेटवर्क काम करणार नाहीत.

जरी डिवाइसमध्ये सिम कार्ड बदलले असले तरीही याचा उपयोग होणार आहे. पण यासाठी मोबाईल चोरी गेल्यावर वापरकर्त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

मोबाईल ब्लॉक करण्यासाठी हे करा?

मोबाईल हरवला असल्यास पोलिसात तक्रार दाखल करा. त्यानंतर मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आणि ऑनलाइन तक्रार करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp लिंकवर क्लिक करावे. या ठिकाणी तुमची माहिती भरून, पोलिसात दिलेल्या तक्रारीची क्रमांक टाकून, अर्ज दाखल केल्यानंतर युनिक तक्रार आयडी तयार होईल.

तसेच तुमचा मोबाईल ब्लॉक होईल. अर्जाचे तपशील तुमच्या मेल आयडीवर प्राप्त होतील. पुढील वापरासाठी तक्रार आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक जतन करून ठेवावा.

अनब्लॉक करण्यासाठी विनंती हे करा? 

पुढे मोबाईल सापडल्यास, सापडलेल्या फोनचा आयएमईआय अनब्लॉक करण्यासाठी विनंती नोंदणी अर्ज भरावा. यासाठी https://www.ceir.gov.in/Request/CeirUserUnblockRequestDirect.jsp लिंकचा वापर करावा. त्यानंतर अर्ज दाखल केल्यावर आयएमईआय अनब्लॉक होईल. पण वापरकर्त्याने ब्लॉकिंग विनंती पोलिसाकडे नोंदविली असेल, तर त्यांना त्यांच्या फोनसाठी अनब्लॉक करण्याची विनंती नोंदविण्यासाठी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा लागेल.

तर आतापर्यंत 4 लाख 67 हजार 567 मोबाईल ब्लॉक, 2 लाख 40 हजार 343 ट्रेस करण्यात आले असून, 7 हजार 965 पुनर्प्राप्त करण्यात आल्याचं या वेबसाईटवर दावा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.