Pink e-rickshaw distribution under Women and Child Development Department
मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट; दहा हजार महिलांना ई-रिक्षा वाटप; योजनेला नागपुरातून सुरुवात. Pink e-rickshaw distribution under Women and Child Development Department.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील दहा हजार गरजू महिलाना “पिंक ई रिक्षा वाटप” करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील दहा हजार गरजू महिलाना “पिंक ई रिक्षा वाटप” करण्यात येत आहे. आज (20 एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची नागपूरात सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात एकूण 8 जिल्ह्यात दहा हजार पिंक ई-रिक्षा वाटप केल्या जात आहे.
यात नागपूर शिवाय पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या आठ टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पिंक रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20% अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. तर उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात या योजनेचा शुभारंभ पार पडत आहे. Pink e-rickshaw distribution under Women and Child Development Department.
लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक इ रिक्षा योजना- मुख्यमंत्री
राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट तर या योजनेमागे आहेच. सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, रात्री अप-रात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे उद्दिष्टही या योजनेमागे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे, पिंक इ-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात करतो आहे, याचा आनंद आहे. नागपुरात 2000 महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील.
लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक इ रिक्षा योजना आहे. या माध्यमातून महिलांना पायावर उभा राहता आले पाहिजे असा उद्देश आहे. तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ, सुरक्षित वातावरण मिळावं, म्हणून महिलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या इ-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महिलानी महिलांसाठी अशी ही रिक्षा असणार आहे. मात्र यात पुरुषांनी बसू नये, असा त्याचा अर्थ नाही. जसं महिला त्यांच घर संसार चांगलं चालवतात, तशीच इ-रिक्षा ही चांगली चालवा, सर्वांना सुरक्षित ठेवा. सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीसांनी आपले मत व्यक्त केलं आहे. ते नागपुरातील कार्यक्रमात बोलत होते.